अखेर ज्येष्ठ नागरिकाला मिळाला दीड वर्षाने न्याय

By Admin | Updated: July 14, 2014 00:33 IST2014-07-13T22:27:08+5:302014-07-14T00:33:06+5:30

अखेर ज्येष्ठ नागरिकाला मिळाला दीड वर्षाने न्याय

Lastly, a senior citizen got justice in a year and a half | अखेर ज्येष्ठ नागरिकाला मिळाला दीड वर्षाने न्याय

अखेर ज्येष्ठ नागरिकाला मिळाला दीड वर्षाने न्याय

सिन्नर : राज्य परिवहन मंडळाच्या येथील आगारातील एका महिला वाहकाने जमा केलेले ज्येष्ठ नागरिकाचे ओळखपत्र अखेर दीड वर्षाने मिळाले. मात्र त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघासह विविध संघटना व व्यक्तींना संघर्ष करण्याची वेळ आली.
येथील वावी वेस भागात राहणारे मधुकर देवराम आढाव (६६) हे दीड वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील हिवरगाव येथून सिन्नरकडे येणाऱ्या बसमधून प्रवास करीत असताना महिला वाहकाने त्यांचे ज्येष्ठ नागरिकत्वाचे ओळखपत्रात चुकीचे वय असल्याची शंका व्यक्त करीत ते जमा केले होते. त्यांना त्यावेळी बस भाड्यात सवलतही देण्यात आली नाही. त्यानंतर प्रवास करताना त्यांना ओळखपत्र नसल्यामुळे भाड्यातील सवलतीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी वाहकाने जमा केलेले ओळखपत्र मिळावे यासाठी येथील बस आगारात अनेक चकरा मारल्या. तथापि, त्यांचे ओळखपत्र आमच्याकडे जमा नसल्याचे सांगून त्यांची बोळवण केली जात होती; मात्र त्यांना माहिती असूनही ओळखपत्र जमा नसल्याचे सांगितले जात होते. त्यांनी महिला वाहकाने ते जमा केल्याचेही सांगितले. मात्र तरीही त्यांना ओळखपत्र देण्यास टाळाटाळ केली जात होती.
ज्येष्ठ नागरिक आढाव यांना न्याय मिळावा म्हणून येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक-अध्यक्ष मु. शं. गोळेसर यांनी या प्रकरणी एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केले. सदर ओळखपत्र मिळाले म्हणून येथील वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र जाजू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एस.टी. कामगार सेनेचे पदाधिकारी देवा सांगळे यांनीही आगार व्यवस्थापकांकडे प्रयत्न केले. याबाबत लोकमतने आवाज उठविल्याने एस.टी. महामंडळाने त्याची दखल घेतली. त्यामुळे महिला वाहकाने जमा केलेले ज्येष्ठ नागरिकाचे ओळखपत्र मध्यंतरी पुन्हा परत करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Lastly, a senior citizen got justice in a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.