एटीएममध्ये गत दोन दिवसांपासून
By Admin | Updated: June 13, 2017 01:32 IST2017-06-13T01:32:33+5:302017-06-13T01:32:49+5:30
ग्राहकांचा संताप : ‘नो कॅश’चा बोर्डएटीएममध्ये खडखडाट

एटीएममध्ये गत दोन दिवसांपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील बहुतांश सरकारी तसेच खासगी बँकांच्या अनेक एटीएममध्ये गत दोन दिवसांपासून खडखडाट झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे़ विशेष म्हणजे, बँकेतील खात्यात पैसे असूनही ते हातात मिळत नाहीत़ काही एटीएममध्ये ‘नो कॅश’, तर काही एटीएम तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचे कारण सांगितले जाते आहे़
महिन्याचा दुसरा शनिवार व रविवार बँक बंद असल्याने गत दोन दिवसांपासून शहरातील स्टेट बँक आॅफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआयसह जवळपास सर्वच बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाला असून, सुमारे ८० टक्के एटीएम केवळ नावालाच उरले आहेत़एटीएम बंद असल्याने वारंवार फेऱ्या मारूनही नागरिकांना कॅश मिळत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांची चलनकोंडी झाली असून, महत्त्वाची कामे रेंगाळून पडली आहेत. त्यातच भरवशाच्या मानल्या जाणाऱ्या एसबीआयच्या एटीएममध्येही कॅश शिल्लक नसल्याचे चित्र आहे़ शाळांमध्ये पाल्यांचे प्रवेश, फी, शालेपयोगी साहित्य खरेदीसाठी एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या पालकांना आल्यापावली परतावे लागले़तांत्रिक अडचणींचे कारणराष्ट्रीयीकृत बँका सुरू होत्या मात्र एटीएममध्ये पैसे नव्हते, तर काही बँकांमध्ये केवळ त्यांच्याच बँकेच्या एटीएमधारकाला पैसे मिळत होते़ दुसऱ्या बँकेच्या एटीटीएमच्या वापरानंतर सिस्टीम डाऊन किवा एरर असा संदेश येत होता़