जिल्ह्यात अंतिम चरणात प्रचार सभांचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:24 AM2019-10-17T01:24:48+5:302019-10-17T01:25:09+5:30

विधानसभा निवडणुकीत अंतिम चरणात आता खºया अर्थाने प्रचाराचा धुरळा उठू लागला असला तरी, काही मतदारसंघात स्टार प्रचारकांनी पायधूळ न झाडल्याने तेथील उमेदवारांना स्थानिक स्तरावरच प्रचारयंत्रणेवर भर देणे भाग पडले आहे. स्टार प्रचारकांच्या सभांसाठी लागणारा खर्च, त्याच्या तयारीत जाणारा वेळ, कार्यकर्त्यांचे लागणारे बळ आणि गर्दी जमविण्यासाठी करावा लागणारा आटापिटा पाहता यंदा राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांनी स्वत:हूनच स्टार प्रचारकांवर फुली मारल्याचेही दिसून आले आहे.

The last step in the district is to dust the publicity meetings | जिल्ह्यात अंतिम चरणात प्रचार सभांचा धुरळा

जिल्ह्यात अंतिम चरणात प्रचार सभांचा धुरळा

Next
ठळक मुद्देस्टार प्रचारकांची काही मतदारसंघांकडे पाठ : जाहीर सभांपेक्षा प्रचार फेऱ्यांवरच अधिक भर

नाशिक : विधानसभा निवडणुकीत अंतिम चरणात आता खºया अर्थाने प्रचाराचा धुरळा उठू लागला असला तरी, काही मतदारसंघात स्टार प्रचारकांनी पायधूळ न झाडल्याने तेथील उमेदवारांना स्थानिक स्तरावरच प्रचारयंत्रणेवर भर देणे भाग पडले आहे. स्टार प्रचारकांच्या सभांसाठी लागणारा खर्च, त्याच्या तयारीत जाणारा वेळ, कार्यकर्त्यांचे लागणारे बळ आणि गर्दी जमविण्यासाठी करावा लागणारा आटापिटा पाहता यंदा राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांनी स्वत:हूनच स्टार प्रचारकांवर फुली मारल्याचेही दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीची मैफल आता समेवर येऊन ठेपली आहे. अवघ्या चार दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांची मतदारसंघ पिंजून काढताना दमछाक होताना दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी प्रक्रियेनंतर गेल्या नऊ दिवसात जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवारांनी आपापल्या कुवतीनुसार शक्तिप्रदर्शन दाखविले आहे. नाशिक शहरातील नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि देवळाली या चारही मतदारसंघात चुरस निर्माण
झाली आहे. विशेषत: नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भाजपचे राष्टÑीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचेच कार्यकर्ता संमेलन झाले आहे तर नाशिक पश्चिममध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झालेली आहे. देवळाली शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो; परंतु याठिकाणी सेनेच्या एकाही स्टार प्रचारकाची जाहीर सभा झालेली नाही.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या सुरुवातीला सटाणा आणि चांदवड या दोन मतदारसंघांत सभा घेतल्या तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिंडोरी मतदारसंघातील वणी, नांदगाव मतदारसंघातील मनमाड आणि येवला येथे जाहीर सभा घेतल्या. राष्टÑवादीचे सध्या फार्मात असलेले अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्ह्यात कळवण, सिन्नर, नाशिक शहर, देवळाली, दिंडोरी, येवला या ठिकाणी प्रचार फेºया काढल्या तर राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सिन्नर, दिंडोरी येथे सभा झाल्या. छगन भुजबळ यांनीही जिल्ह्यात सभा घेतल्या. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची बुधवारी (दि. १६) नाशिकला डोंगरे वसतिगृह मैदानावर तोफ धडाडली. काँग्रेसचा एकही स्टार प्रचारक नाशिक जिल्ह्यात फिरकला नाही. मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे असुदुद्दीन ओवेसी यांची एकमात्र सभा झाली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नांदगाव मतदारसंघातील मनमाड येथे सभा झाली तर नाशिकची नियोजित सभा रद्द झाली. जिल्ह्यात माकपचे दोन ठिकाणी उमेदवार लढत देत आहेत; परंतु नाशिक पश्चिममध्ये पक्षाच्या पॉलिटब्युरो सदस्य आणि माजी खासदार सुभाषिनी अली यांची एकमेव सभा होऊ शकली.
इगतपुरी, देवळालीकडे सेना नेत्यांची पाठ
जिल्ह्यातील निफाड, कळवण, इगतपुरी, मालेगाव बाह्य तसेच देवळाली या मतदारसंघात कोणत्याही राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकाने अद्याप हजेरी लावलेली नाही. विद्यमान आमदाराच्या पक्षांतरामुळे चर्चेत आलेल्या इगतपुरी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेप्रसंगी झालेली सभावगळता शिवसेनेकडून एकाही स्टार प्रचारकाची सभा झाली नाही. त्यामुळे तेथील सेनेच्या जागेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचप्रमाणे सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाºया देवळालीकडेही राज्यस्तरीय शिवसेना नेत्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. निवडणूक प्रचार संपायला आता अवघे तीन दिवस उरले असून या अखेरच्या चरणात प्रचाराचा धुराळा आणखी उठण्याची शक्यता आहे. काही सभा नियोजित आहेत. मात्र, यंदा जाहीर सभांऐवजी उमेदवारांनी घरोघरी प्रचारयंत्रणा राबविण्यावरच अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे.
युतीच्या तुलनेत आघाडीत एकोपा
विधानसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप युती झाली असली तरी, भाजपने शिवसेनेच्या आणि शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतलेल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठीच सभा घेतल्या. त्यातही नाशिक पश्चिममध्ये युतीत शिवसेनेने उघडपणे असहकार पुकारलेला आहे. अन्यत्रही अपवादानेच परस्परांसाठी मते मागितली जात आहेत. युतीच्या तुलनेत कॉँग्रेस आघाडीत मात्र एकोप्याचे दर्शन घडताना दिसत आहे. सभांचे व्यासपीठ असो की पदयात्रा, दोन्ही पक्षाचे नेते-कार्यकर्ते त्यात सोबतीने दिसत आहेत.

Web Title: The last step in the district is to dust the publicity meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.