...अखेर ‘ती’ चिमुकली विसावली आईच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:20 IST2021-02-17T04:20:30+5:302021-02-17T04:20:30+5:30
--- ..म्हणे मित्राचे बाळ सांभाळायला आणले जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ठक्कर बाजार येथून काळे याने मुलीला सोबत घेत रिक्षात ...

...अखेर ‘ती’ चिमुकली विसावली आईच्या कुशीत
---
..म्हणे मित्राचे बाळ सांभाळायला आणले
जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ठक्कर बाजार येथून काळे याने मुलीला सोबत घेत रिक्षात बसून पंचवटी कारंजा गाठले. तेथून फुलेनगर येथे राहत्या घरी तो आला. जेव्हा घरी आल्यावर पत्नीने काळे यास ‘बाळ कुणाचे आहे’ असे विचारले असता, ‘मित्राचे बाळ आहे, सांभाळायला आणले’ असे त्याने सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. दोन दिवस उलटल्यानंतर मंगळवारी सकाळी पत्नीने पुन्हा हटकून ‘ज्या मित्राचे बाळ आहे, त्याला पुन्हा देऊन या’ असे ठणकावून सांगितल्यानंतर काळे हा लहानग्या मुलीला चादरीत गुंडाळून घेत पहाटेच घराबाहेर पडला.
----
कोट--
शासकीय रुग्णालयातुन एका बालिकेचे अपहरण होणे ही अत्यंत गंभीर बाब शहर पोलिसांकरिता होती. यामुळे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी तात्काळ शनिवारी संध्याकाळी बैठक बोलावून सर्वप्रकारे गुन्हे शाखांच्या पथकाने तसेच सरकारवाडा गुन्हे शोध पथक या सर्वांना चिमुकलीला शोधण्याचा ‘टास्क’ सोपविला. शहराबाहेरील धार्मिक स्थळे आणि मुंबईमध्येही अपहृत बालिकेचा शोध घेतला जात होता. सुदैवाने ही चिमुकली शहरातच सुखरुपपणे सापडली. बालिकेला पळवून नेणारी व्यक्ती सराईत नसून मोलमजुरी करणारी पक्षघाताचा झटका बसलेली आहे. गुन्हेगारीचा कुठलाही इतिहास या व्यक्तीच्या नावावर आढळून आलेला नाही.
- पौर्णिमा चौगुले-श्रींगी, उपायुक्त