नवरात्रोत्सव तयारी अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: September 26, 2016 01:44 IST2016-09-26T01:43:42+5:302016-09-26T01:44:13+5:30

महापालिका निवडणुकीमुळे महत्त्व प्राप्त

The last phase of Navaratri festival preparations | नवरात्रोत्सव तयारी अंतिम टप्प्यात

नवरात्रोत्सव तयारी अंतिम टप्प्यात

इंदिरानगर : परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाच्या वर्षी महापालिका निवडणुकीमुळे नवरात्रोत्सवास विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.
युनिक ग्रुपच्या वतीने गतवर्षीप्रमाणे यंदाही युवती व महिलांसाठी दांडियाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच आॅक्रेस्ट्राबरोबरच गायक आणि बक्षिसांची लयलूट करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सांगितले.
गणेश युवक मित्रमंडळ व राजे छत्रपती युवक मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने कलानगर येथे दांडियाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी उत्कृष्ट दांडिया खेळणारे, उत्कृष्ट वेशभूषा, बेस्ट कपलसह विविध बक्षिसे देण्यात येणार असल्याचे गणेश जाधव व ऋषी वर्मा यांनी सांगितले.
परिसरात दांडियाची सुरुवात करणाऱ्या सह्याद्री युवक मित्रमंडळाच्या वतीने यंदा राणेनगर येथील मैदानावर दांडिया रासचे आयोजन करण्यात येणार आहे. दांडियाप्रेमींना आकर्षित करण्यासाठी बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. तसेच हुल्लडबाजी टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक व युवकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे अमोल जाधव यांनी सांगितले.
चेतनानगर येथे बाजीराव फाउंडेशनच्या वतीने सुमारे पाच वर्षांपासून दांडियाचे आयोजन करण्यात येत आहे. शिस्तबद्ध दांडिया आणि दररोज दांडियाप्रेमींना बक्षिसे देण्यात येतात, असे साहेबराव आव्हाड यांनी सांगितले.
पांडवनगरीमध्ये गेल्या चार वर्षांपासून नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने दांडियाचे आयोजन करण्यात येत आहे. वाद्यवृंदाच्या व गायकांच्या तालावर दांडियारास दांडियाप्रेमी खेळतात, असे योगेश दिवे यांनी सांगितले.
दीपालीनगर येथे श्रीसाईराम सामाजिक व बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दांडियामध्ये दररोज लकी ड्रॉ द्वारे एक पैठणी व इतर बक्षिसे देण्यात येणार आहेत, असे चंद्रकांत बोंबले यांनी सांगितले.
दरम्यान, इंदिरानगर परिसरात इच्छुक उमेदवारांकडून नवरात्रोत्सवाच्या हालचाली जोमाने सुरू झाल्या आहेत. यामध्ये आॅर्केस्ट्रा, गायन, सिनेकलावंत शो यांची लयलूट करण्यात येणार आहे. त्यामुळे दांडियाप्रेमींची आणि मंडळांची दिवाळीच साजरी होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: The last phase of Navaratri festival preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.