शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

पदाधिकाऱ्यांची अखेरची सभा पुढच्या आठवड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:05 AM

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असतानाच तत्पूर्वी पुढच्या आठवड्यात स्थायी समिती व सर्वसाधारण सभा घेण्याचे पदाधिकारी, प्रशासनाने निश्चित केले असून, या सभांच्या माध्यमातून आगामी काळातील विकासकामांच्या मंजुरीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्थायीपाठोपाठ सर्वसाधारण सभेचे नियोजन

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असतानाच तत्पूर्वी पुढच्या आठवड्यात स्थायी समिती व सर्वसाधारण सभा घेण्याचे पदाधिकारी, प्रशासनाने निश्चित केले असून, या सभांच्या माध्यमातून आगामी काळातील विकासकामांच्या मंजुरीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिकाºयांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या असून, दि. २० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विषय समित्यांचे सभापतींची वाढविलेली मुदत संपुष्टात येत आहे. या मुदतीनंतर नवीन अध्यक्ष व पदाधिकाºयांची निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश आहेत. त्यामुळे तत्पूर्वी पदाधिकारी, सदस्यांच्या गटातील महत्त्वाची कामे मार्गी लागण्याबरोबरच प्रशासनाला काही महत्त्वाच्या कामांसाठी मंजुरी हव्या असल्या तरी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासनातील बेबनावामुळे ५ डिसेंबर रोजी आयोजित केलेली स्थायी समितीची सभा होवू शकली नव्हती.अखर्चित निधी व विकास कामे होत नसल्याच्या कारणावरून सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे ही सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी तहकूब केली होती. त्यामुळे तहकूब सभा सात ते दहा दिवसांत घेणे बंधनकारक असताना प्रशासनानेयेत्या दि. १७ डिसेंबर रोजी स्थायी समितीची सभा घेण्याचे निश्चित केले आहे.स्थायी समितीच्या सभेचा अजेंडा सदस्यांना पाठविण्यात आला आहे. दुसरीकडे विद्यमान पदाधिकाºयांचा कार्यकाळ पुढच्या आठवड्यात संपुष्टात येत असल्याने या पदाधिकाºयांना गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सहकार्य करणारे सदस्य, प्रशासनातील अधिकाºयांनी केलेली मदत पाहता अशा सर्वांचे आभार मानण्याबरोबरच आर्थिक वर्षाअखेर सर्व निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकाºयांची मुदत ज्या दिवशी म्हणजे दि. २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे, त्याच दिवशीअखेरची सभा घेण्याचे ठरले आहे.अविश्वास ठराव बासनातजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशीची मागणी करण्याबरोबरच त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभा घेण्याची मागणी शिवसेना, राष्टÑवादी व भाजपच्या गटनेत्यांनी केली असून, तसे पत्र त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना दिले आहे. मात्र अखेरच्या काळात प्रशासनाविरोधात भूमिका घेण्याची मानसिकता कोणत्याही पदाधिकाºयांची नाही. त्यामुळे भुवनेश्वरी एस. यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बासनात जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निव्वळ गटनेत्यांच्या मागणी पत्राने अविश्वास ठरावासाठी विशेष सभा बोलविण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे दि. २० डिसेंबर रोजी बोलविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेवर अविश्वासाचा कोणताही विषय अजेंडावर ठेवण्यात आलेला नाही.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक