शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव, नांदगावला वादळी पाऊस

By admin | Updated: June 6, 2014 23:50 IST

चार जनावरांचा मृत्यू : कांद्यासह वाहनांचे नुकसान, वृक्ष कोसळले

लासलगाव : परिसराला गुरुवारी सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला. वादळामुळे सुमारे एक कोटी एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जोरदार पावसाने बाजार समितीत आलेल्या कांद्याचेही नुकसान झाले. शंभर वाहनातील कांद्याचा लिलाव होऊ शकला नाही. कांदा शेडचे पत्रे उडून गेल्यामुळे अतोनात हानी झाली. परिसरातील टाकळी विंचूर, पिंपळगाव नजीक, निमगाव वाकडा, ब्राह्मणगाव, विंचूर भागातील बर्‍याच घरांचे पत्रे उडाले.लासलगावचे कांदा व्यापारी सुभाष लुणावत, बाळासाहेब दराडे, संदीप जगताप, सोहनलाल भंडारी, संचालाल नंदराम भंडारी, नितीनकुमार जैन, राजेंद्र कासट, कांतीलाल मांगीलाल सुराणा यांचेही अतोनात नुकसान झाले. वादळात अनेक ठिकाणी शेड कोसळल्यामुळे त्याखाली दबून अनेक वाहनांचेही नुकसान झाले. वादळी पावसाने वीज वाहक तारा मोठ्या प्रमाणावर खाली पडलेल्या आहेत. कोटमागाव रोडवरील मुख्य वाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. नांदगाव : बुधवारी सायंकाळी ५ वाजेला पावसासोबत आलेल्या वादळाने साकोरा, पिंपरखेड, गंगाधदी, पोखरी, जातेगाव आदि गावासोबतच नांदगाव शहर व परिसरात प्रचंड वित्तीय हानी केली. ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठाले वृक्ष मुळासकट उन्मळून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. अनेकांच्या घराचे कौले, पत्रे दूरवर उडाले. काही ठिकाणी भिंती पडल्यात. लोहशिंगवे येथे वीज पडल्याने एक गाय ठार झाली. साकोरा परिसरातल्या सारताळे येथील अंगणवाडीचे छत उडून गेले. तर मराठी शाळेची दुरावस्था झाली. नांदगावच्या येवला व दहेगाव रोडवरील आडतदार कांदा व्यापार्‍यांचे साठवणुकीचे छतच जमीनदोस्त झाल्याने जवळपास पंधरा हजार क्विंटल कांदा भिजून मोठे नुकसान झाले. एकट्या नांदगाव परिसरातल्या सव्वीस जणांचे मिळून एक कोटी २६ लाख ९0 हजार ७५0 रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा गाव तलाठ्याने केला आहे. वीज वितरण विभागाचे जवळपास १३५च्या आसपास खांब मोडून पडल्याने बुधवारपासून खंडीत झालेला वीजपुरवठा आज दुपारपासून काही प्रमाणात सुरळीत झाला. प्रशासकीय संकुलातील तहसील व तालुका पंचायत समिती कार्यालयातील छतावरील शेकडो कौल दूरवर उडून परिसरात कौलांचा खच साचलेला होता.वादळाने अतोनात नुकसान केल्याने पंचनाम्यांचे काम सुरूच होते. आनंदवाडी भागातील नगरसेविका इंदिरा बनकर यांच्या दारासमोरचे झाड कोसळून त्यांच्या घरावर पडले. रेल्वे कॉलनीत सिमेंटचे पत्रे दूरवर उडालेत. शिवाय वीजेचेखांब मोडून पडले. गंगाधरी गावातील अनिल आहेर, सुदाम सापटे, बाळू इघे आदिंच्या घरावरील पत्रे उडालेत गिरणानगरला अशीच हाती झाली.जातेगावला पिनाकेश्वर महादेव मंदिराचे छतच हवेत उडून गेले. पोखरी, साकोरा, कुसुमतेल आठ गावातून या चक्रीवादळाचा तडाखा बसला. साकोरा गावात पोल्ट्री फार्म, शाळा इमारती सोबत मळ््यात वस्ती करून राहणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान झाले.कुसुमतेल येथे शिवाजी मेंगाळ यांच्या घराचे पत्रे उडून त्यांची गाय ठार झाली. हमालवाडा, कैलासनगर भागात झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक नंदू खुरसणे यांनी केली. कांता फोफलिया, रामनिवास कलंत्री, ओमप्रकाश अग्रवाल, भुषण धुम, अमृता कासलीवाल, उमाकांत घोगाणे या आडतदारांच्या कांद्याच्या चाळीचे नुकसान होवून लाखो रुपयांचा कांदा भिजला. (वार्ताहर)