लासलगाव महाविद्यालयाचा अनोखा विक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 17:44 IST2019-02-19T17:43:44+5:302019-02-19T17:44:05+5:30
लासलगाव : स्किल साथी या भारत सरकारच्या उपक्र माअंतर्गत लासलगाव महाविद्यालयात १५ ते ३५ वयोगटातील तरु णांची कोणतेही शुल्क न आकारता नोंदणी करून घेण्यात आली.

लासलगाव महाविद्यालयाचा अनोखा विक्र म
लासलगाव : स्किल साथी या भारत सरकारच्या उपक्र माअंतर्गत लासलगाव महाविद्यालयात १५ ते ३५ वयोगटातील तरु णांची कोणतेही शुल्क न आकारता नोंदणी करून घेण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयातील संगणक विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी महाविद्यालय व परिसरातील एकूण ३१२३ तरूणांची नोंदणी या उपक्र माअंतर्गत एका दिवसात पूर्ण केली. हा एक प्रकारचा विक्र म आहे. यासाठी त्यांना महाराष्ट्र शासन नियुक्त अधिकारी नीलेश भटनागर, राजेश आढाव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्र मासाठी महाविद्यालयाचे जनरल सेक्र ेटरी गोविंद होळकर, प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, उपप्राचार्य डॉ.रोहिदास पाटील, डॉ.आदिनाथ मोरे, पर्यवेक्षक उज्वल शेलार, प्रा डॉ सोमनाथ आरोटे, प्रा.किशोर गोसावी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्र मांतर्गत तरु णांना रोजगाराची तसेच आपल्या कौशल्यांचा विकास करण्याची संधी सरकार उपलब्ध करून देणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.