लासलगाव : येथील महाविद्यालयीन युवती अमृतनगर जवळील निर्मला माता मंदिरासमोरून पायी जात असतांना अॅक्टीव्हा गाडीवरून आलेल्या युवकाने तिचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडली.महाविद्यालयीन युवती अश्विनी सुभाष खुटे (२०, रा. पिंपळगाव नजीक) ही सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास अमृतनगर जवळील निर्मला माता मंदिरासमोर पायी जात असतांना राखाडी रंगाच्या अॅक्टीव्हावरील युवकाने तिचा न ऊ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला.या युवतीच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर एस सोनवणे करीत आहेत.
लासलगावला अॅक्टीव्हावरील युवकाने हिसकावला मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:23 IST