लासलगावी शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:05 IST2018-03-05T00:05:38+5:302018-03-05T00:05:38+5:30
लासलगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषात लासलगाव शहर परिसरात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

लासलगावी शिवजयंती उत्साहात
लासलगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषात लासलगाव शहर परिसरात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रविवारी (दि. ४) सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास बालिकेच्या हातून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर , लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवा पाटील, सुरासे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र होळकर, गुणवंत होळकर, पंचायत समिती माजी सदस्य प्रकाश पाटील, दत्ता पाटील, सचिन होळकर, राजेंद्र चाफेकर, भय्या भंडारी, नरेंद्र सानप, मयूर झांबरे, डॉ. विकास चांदर, संजय बिरार, बबन शिंदे, बाळासाहेब जगताप, डॉ. अनिल बोराडे, संतोष पानगव्हाणे, संजय लंबे, संजय महाले, दिनेश जाधव, पप्पू पटेल, ललित दरेकर, संजय जाधव, तेजस्वी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थि होते. शिवजयंतीनिमित्त अनेक भागात, रस्त्यावर भगवे ध्वज आणि फताका लावण्यात येऊन शहर भगवेमय झाले होते. सकाळपासूनच शिवगीतांनी वातावरण चैतन्यमय झाले होते.