शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावकरांना हिरवट पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:23 IST

नांदूरमध्यमेश्वर धरणात शेवाळ आणि पानवेलीमुळे दुर्गंधी

ठळक मुद्देयोजनेसाठी वापरलेले पाईप मोठ्या प्रमाणावर जीर्ण झाल्याने पाईपलाईनवर दबाव (प्रेशर) येऊन त्या वारंवार फुटण्याचे प्रकार घडत आहेत.

लासलगाव : नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या पाणी उपसा होत असून पाटबंधारे विभागाचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पानवेली आणि शेवाळ साचून लासलगावसह १६ गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे पाईपलाइनवर दबाव येऊन ती फुटण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होताना दिसून येत आहे.लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजना विविध समस्येच्या विळख्यात अडकलेली आहे. १६ गाव पाणी पुरवठा समितीने शासनाकडून या योजनेच्या दुरुस्तीकामासाठी २ कोटी रु पये मिळावेत म्हणून प्रयत्न केले परंतु शासनाने केवळ ११.३० लाख रु पये मंजूर केलेले आहे. योजनेसाठी वापरलेले पाईप मोठ्या प्रमाणावर जीर्ण झाल्याने पाईपलाईनवर दबाव (प्रेशर) येऊन त्या वारंवार फुटण्याचे प्रकार घडत आहेत. नांदूरमध्यमेश्वर धरणामध्ये 10 मे रोजी पाणी साठा करून देण्यात आला. परंतु, पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी चोरी होत असून अवैधरीत्या उपसा होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे जून महिन्यात पाणी पुरवठा करणे समितीस अवघड होणार आहे. सदर धरणातील पानवेली पाटबंधारे विभागाने न काढल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर दुषित होत आहे. सदर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवावी किंवा समितीस निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा विधानसभा निवडणुकीवर लासलगाव विंचूर सह १६ गावे बहिष्कार टाकतील असा इशारा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण