लासलगावी कांदा लिलाव ठप्पच!

By Admin | Updated: November 20, 2014 00:31 IST2014-11-20T00:31:13+5:302014-11-20T00:31:13+5:30

लासलगावी कांदा लिलाव ठप्पच!

Lasalgaon onion auctioned! | लासलगावी कांदा लिलाव ठप्पच!

लासलगावी कांदा लिलाव ठप्पच!

लासलगाव : स्थानिक व्यापारी संघटनेचे सभासद नसल्याचे कारण देत लिलावात सहभागी न होण्याच्या मर्चण्ट्स असोसिएशनच्या सदस्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येथील कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशी बुधवारीही ठप्प झाले. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. मर्चण्ट्स असोसिएशनच्या १७९ व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने कारणे दाखवा नोटिसा बजावून त्यांची अनुज्ञप्ती रद्द का करू नये, असे विचारण्यात आले आहे. व्यापाऱ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
बाजार समितीचे मुख्य आवार तसेच निफाड, विंचूर ही दोन उपआवारे आहेत. या तिन्ही आवारासाठी २२७ आडते अनुज्ञप्तीधारक, तर २१६ हे खरेदीदार अनुज्ञप्तीधारक व्यापारी आहेत. यापैकी लासलगाव येथील मर्चण्ट्स असोसिएशनचे १७९ सभासद आहेत. लासलगाव येथील मर्चण्ट्स असोसिएशनचे सदस्य मंगळवारी व बुधवारी लिलावात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे शेतमालाचे लिलाव बंद राहिले आहेत. त्यामुळेच बाजार समितीच्या वतीने कारणे दाखवा नोटिसा देण्याची कारवाई करण्यात आली आहे. (वार्ताहर)

आडमुठी भूमिका : १७९ व्यापाऱ्यांना बजावल्या कारणे दाखवा नोटिसा

करोडोंची उलाढाल ठप्प
लासलगाव मर्चण्ट्स असोसिएशनच्या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने लिलाव बेमुदत बंद राहण्याची शक्यता आहे. लिलावाअभावी करोडोंची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

आज भुजबळांची भेट घेणार
शेतमालाच्या लिलावावरून निर्माण झालेल्या पेचावर चर्चा करण्यासाठी मुंबईत गुरुवारी आमदार छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे लासलगाव मर्चण्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी सांगितले.

Web Title: Lasalgaon onion auctioned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.