लासलगाव ते नाशिक महामार्ग बससेवा सोमवारपासुन सुरु?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 19:09 IST2020-08-12T19:08:19+5:302020-08-12T19:09:03+5:30
लासलगाव : येथील बस आगाराच्या वतीने दि. २१ मार्चपासुन बंद असलेली लासलगाव ते नाशिक व नाशिक ते लासलगाव या मार्गावर चांदोरी मार्गे सोमवार (दि.१७)पासुन दररोज प्रत्येकी दोन अशा एकुण चार फेऱ्या सुरू होणार आें, मात्र जेष्ठ नागरिक व बारा वर्षाखालील मुलांना बसने प्रवास करता येणार नाही अशी माहीती लासलगाव बस आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी दिली.

लासलगाव ते नाशिक महामार्ग बससेवा सोमवारपासुन सुरु?
लासलगाव : येथील बस आगाराच्या वतीने दि. २१ मार्चपासुन बंद असलेली लासलगाव ते नाशिक व नाशिक ते लासलगाव या मार्गावर चांदोरी मार्गे सोमवार (दि.१७)पासुन दररोज प्रत्येकी दोन अशा एकुण चार फेऱ्या सुरू होणार आें, मात्र जेष्ठ नागरिक व बारा वर्षाखालील मुलांना बसने प्रवास करता येणार नाही अशी माहीती लासलगाव बस आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी दिली.
मास्क शिवाय बसमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच फिजिकल डिस्टन्सचा वापर करीत प्रवास करावा लागणार आहे. लासलगाव येथुन दररोज सकाळी ९ व दुपारी २ वाजता बस निघून ती नाशिक महामार्ग बसस्थानक येथे जाईल व नाशिक महामार्ग बसस्थानक येथुन दररोज ११.३० व सायंकाळी ५ वाजता चांदोरी मार्गे या बससेवा सुरू होणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.