शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
2
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
3
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
4
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
5
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
6
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
7
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
8
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
9
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
10
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
11
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
12
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
13
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
14
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
15
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
16
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
17
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
18
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
19
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
20
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायपोर्टसाठी लासलगावला चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:13 IST

लासलगांव : नाशिक जिल्ह्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट विकसीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सोमवारी लासलगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईवाय एंटरप्राइजेजच्या प्रज्ञा प्रियदर्शनी आणि ऐश्वर्या मुळे यांच्या शिष्टमंडळाने लासलगाव मधून होणारी कांदा, मका, भाजीपाला आणि फळे निर्यातीची माहिती घेऊन चाचपणी केली.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून पुढाकार

लासलगांव : नाशिक जिल्ह्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट विकसीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सोमवारी लासलगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईवाय एंटरप्राइजेजच्या प्रज्ञा प्रियदर्शनी आणि ऐश्वर्या मुळे यांच्या शिष्टमंडळाने लासलगाव मधून होणारी कांदा, मका, भाजीपाला आणि फळे निर्यातीची माहिती घेऊन चाचपणी केली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये नाशिक जिल्ह्यात ५०० कोटी रु पये गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टला मान्यता दिली. सुरु वातीला निफाडमध्ये हा या ड्रायपोर्ट होणार होता. मात्र जेएनपीटीच्या माध्यमातून ईवाय एंटरप्राइजेज लासलगांव मध्ये सोमवारी पाहणी करण्यात आली.कांद्यासाठी आशिया खंडातील प्रथम क्र मांकाची बाजारपेठ म्हणून लासलगाव ओळखले जाते. कांद्याबरोबरच, डाळिंब, टोमेटो, भाजीपाला मका आणि भुसार मालासाठी लासलगांव अग्रेसर आहे. कांदा, आंबा, डाळी, मसाले यासह अनेक पिकांवर विकिरण प्रक्रि या लासलगांव येथील केन्द्रामध्ये केली जाते. दरवर्षी लासलगाव मधून आॅस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, गल्फकंट्री आदी ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात केला जातो. लासलगांव शहरामध्ये मध्य रेल्वेची सुविधा असून या रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कांदा पाठविला जातो. त्यामुळे लासलगाव मध्ये जर या ड्रायपोर्टची सुविधा सुरू करण्यात आली तर याचा पिंपळगाव बसवंत, निफाड, चांदवड, मनमाड, उमराणे, झोडगे, धुळे येथील बाजार समिती घटकाना फायदा होणार आहे.यावेळी बाजार समिती सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर, सचिव बी. वाय. होळकर, कांदा निर्यातदार नितिन जैन, ओमप्रकाश राका, मनोज जैन, ऋृषभ राका, सागर जैन, राजाराम सांगळे, संजय सांगळे, वेफकोचे अध्यक्ष संजय होळकर, दाणा व्यापारीरुपेश चोरिडया, मुख्य लेखापाल नरेंद्र वाढवणे आदी उपस्थित होते.