लासलगावी ‘आज अर्ज, उद्या कर्ज’
By Admin | Updated: August 18, 2016 23:58 IST2016-08-18T23:49:49+5:302016-08-18T23:58:33+5:30
बळीराजाला दिलासा : शेतकरी मेळाव्यात घोषणा

लासलगावी ‘आज अर्ज, उद्या कर्ज’
लासलगाव : शेतकऱ्यांना शासकीय तसेच खासगी बँका कर्ज देण्यासाठी होणारी ओढाताण थांबविण्याठी युनियन बँक आॅफ इंडिया निफाड शाखेचे अधिकारी चेतन कुलथे यांनी टाकळी येथील शेतकरी मेळाव्यात ‘कागदपत्रांची पूर्तता करून आणा, आज अर्ज उद्या कर्ज’ अशी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जासंबंधीच्या समस्या जाणून त्यांच्या समस्यांचे निरसन केले. युनियन बँक आॅफ इंडियाने शेतकऱ्यांच्या भावना सामजून ‘आज अर्ज आणि उद्या कर्ज’ या शब्दात बँकेची रचना त्यांच्यासमोर मांडली. तसेच मार्च मध्ये सुरू झालेल्या या बँकेने आत्तापर्यंत साडेतीन कोटी रूपयांचा उत्कृष्ट व्यवसाय केला आहे असेही ते म्हणाले. टाकळी विंचुर गावातील ८ टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिल्याचेही त्यांनी सांगितले. सदर कार्यक्र माचे आयोजन शेलेश काळे यांनी केले याप्रसंगी टाकळी विंचूर चे उपसरपंच शिवा पाटील सुरासे, सखुताई वैराळ, नवनाथ पवार, पोपट काळे, पोलिस पाटील विलास काळे, संतोष राजोळे , दादासाहेब काळे, संदीप कायस्थ,चंद्रकांत काळे, रफिक शेख, शंकर शिंदे, रेवणनाथ शिंदे, राजेंद्र काळे, संजय काळे, जगन काळे, महादेव काळे, पोपट लंके, माणीक पवार, राहुल आहेर, अप्पा उशीर, गौरख चव्हाण ,दिपक जाधव, दगडू शिंदे, बापू शिंदे, मनोज काळे, जिभा काळे उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन कैलास पठारे यांनी केले. शेलेश काळे व चंद्रकांत काळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)