लासलगावी लेव्हीप्रश्नी वाद

By Admin | Updated: July 1, 2014 01:29 IST2014-06-30T23:15:36+5:302014-07-01T01:29:50+5:30

लासलगाव : माथाडी कामगार व व्यापारी यांच्या लेव्हीप्रश्नी तोडगा निघण्यासंदर्भात पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली.

Lasalgaavi Levi | लासलगावी लेव्हीप्रश्नी वाद

लासलगावी लेव्हीप्रश्नी वाद

लासलगाव : माथाडी कामगार व व्यापारी यांच्या लेव्हीप्रश्नी तोडगा निघण्यासंदर्भात पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुचित केल्यानुसार कृषी पणन मंडळाचे संचालक मिलिंंद आकरे, नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे व पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी लासलगाव बाजार समितीस भेट दिली प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली.
प्रथमता सचिव बी.वाय.होळकर व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार डागा, नितीन जैन व ओमप्रकाश राका यांच्याशी चर्चा केली कृषी पणन मंडळाचे संचालक मिलिंंद आकरे, उपनिबंधक सुनील बनसोडे व पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी लासलगाव बाजार समितीचे शेतकरी मतदारसंघाचे संचालक बबनराव सानप, राजाभाऊ दरेकर, वैभव तासकर सचिव बी.वाय.होळकर यांच्याकडून सविस्तर माहिती
घेतली.
त्यानंतर त्यांनी व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार डागा,नितीन जैन व ओमप्रकाश राका यांच्याशी चर्चा करतांना लेव्हीची आकारणी, बाजार समितीत होणारी हमाली तोलाईचे दर व प्रत्यक्षात होणारी हमाली तोलाई याची सविस्तर माहीती घेतली.

त्यानंतर माथाडी संघटनेचे सेक्रेटरी प्रकाश शिंदे सुनील यादव दिलीप गायकवाड,पिंपळगाव बाजार समितीचे कामगार संचालक नारायण पोटे तसेच हमाल व तोलणारांचे प्रतिनिधी विष्णु निकम ,विठ्ठल नाबरिया.विठ्ठल कुटे यांच्या शी कामगारांची भुमिका समजावुन घेतली.
कृषी पणन मंडळाचे संचालक मिलींंद आकरे नासिकचे जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे व पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी बाजार समितीत होणारी हमाली तोलाईचे दर व प्रत्यक्षात होणारी हमाली तोलाई याची सविस्तर माहीती घेतली सुमारे दोन तासाच्या पाहणी प्रसंगी सचिव बी.वाय होळकर, सुदीन टर्ले,नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत ,सुरेश विखे त्यांचे समवेत होते
.काम नाही तर दाम नाही या तत्वानुसार व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडुन खरेदी केलेला शेतीमाल व्यापाऱ्यांपर्यत पोहचविण्याच्या प्रकिेयेदरम्यान तसेच गेली काही वर्षे शेतीमाल वजनमान हे भुईकाट्यावर होत असल्याने व शेतीमाल यांत्रीक पध्दतीने वाहनातुन खालीहोत असल्याने नो वर्क नो वेजेस या तत्वानुसार न केलेल्या कामाची हमाली व तोलाई तसेच त्याची होणारी लेव्ही देण्याबाबत वाद प्रलंबीत आहे (वार्ताहर)

Web Title: Lasalgaavi Levi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.