लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : येथील राम मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पहाटे ४ वाजता अमित भावसार यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. ६ वाजेपर्यंत काकड आरती झाली. त्यानंतर ८ वाजता अनिल वाघ, सागर पारीख, महेंद्र पाटील, गोपाळ वडनेरे, सुदर्शन वाघचौरे यांनी सपत्नीक महापूजन केले. यावेळी अध्यक्ष बबनराव पाटील, विश्वस्त डॉ. कैलास पाटील, अशोकराव होळकर, नानासाहेब पाटील, डॉ. युवराज पाटील, विनोद पाटील, कवी प्रकाश होळकर, विष्णू निकम, सुरेश वडनेरे, ग्रामस्थ मधुकर गावडे, साहेबराव वाघचौरे, हरिभाऊ होळकर यांसह मंदिरातील पुजारी अशोक अग्निहोत्री, नीलेश अग्निहोत्री, भास्कर जोशी, जितु गुरव, नंदकिशोर भंडारी यांसह भाविक उपस्थित होते.
लासलगावी महापूजा
By admin | Updated: July 4, 2017 23:49 IST