लासलगावी महापूजा

By Admin | Updated: July 4, 2017 23:49 IST2017-07-04T23:49:34+5:302017-07-04T23:49:57+5:30

लासलगाव : राम मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त अमित भावसार यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.

Lasalagavi Mahapooja | लासलगावी महापूजा

लासलगावी महापूजा

लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : येथील राम मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पहाटे ४ वाजता अमित भावसार यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. ६ वाजेपर्यंत काकड आरती झाली. त्यानंतर ८ वाजता अनिल वाघ, सागर पारीख, महेंद्र पाटील, गोपाळ वडनेरे, सुदर्शन वाघचौरे यांनी सपत्नीक महापूजन केले. यावेळी अध्यक्ष बबनराव पाटील, विश्वस्त डॉ. कैलास पाटील, अशोकराव होळकर, नानासाहेब पाटील, डॉ. युवराज पाटील, विनोद पाटील, कवी प्रकाश होळकर, विष्णू निकम, सुरेश वडनेरे, ग्रामस्थ मधुकर गावडे, साहेबराव वाघचौरे, हरिभाऊ होळकर यांसह मंदिरातील पुजारी अशोक अग्निहोत्री, नीलेश अग्निहोत्री, भास्कर जोशी, जितु गुरव, नंदकिशोर भंडारी यांसह भाविक उपस्थित होते.

Web Title: Lasalagavi Mahapooja