शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अमृत आहारात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 1:04 AM

इगतपुरी : तालुक्यातील वैतरणा परिसरातील नागोसली गावातील अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या अमृत आहारामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अमृत आहारात अळ्या आढळून आल्यामुळे ग्रामस्थ अशोक शिंदे यांनी अळ्यायुक्त आहार प्रकल्प अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचा राग आल्याने सदर अंगणवाडी सेविकेने घोटी पोलिसांत त्यांच्या विरु द्ध तक्र ार दिली आहे.

ठळक मुद्देनिवेदन : नागोसली गावाच्या अंगणवाडीतील प्रकार

इगतपुरी : तालुक्यातील वैतरणा परिसरातील नागोसली गावातील अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या अमृत आहारामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अमृत आहारात अळ्या आढळून आल्यामुळे ग्रामस्थ अशोक शिंदे यांनी अळ्यायुक्त आहार प्रकल्प अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचा राग आल्याने सदर अंगणवाडी सेविकेने घोटी पोलिसांत त्यांच्या विरु द्ध तक्र ार दिली आहे.तालुक्यातील नागोसली अंगणवाडीत नागोसली गाव, शिदवाडी येथील लाभार्थी या ठिकाणी लाभ घेतात; मात्र अंगणवाडी सेविका यांच्या नेहमी तक्रारी असल्यामुळे व त्या नेहमी आपल्या अधिकाराचा दम दाखवत असल्यामुळे ग्रामस्थ अंगणवाडीत येण्यास घाबरतात; मात्र पोषण आहारात अळ्या व किडेयुक्त निकृष्ट आहार दिल्यामुळे काही ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यामुळे अंगणवाडी सेविकेने मनात राग धरून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.याबाबत नागोसलीचे ग्रामस्थ अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कैलास ताठे, ढवळू होले, रवि ताठे, तानाजी शेलार, गिरिधर शिंदे यांच्यासह मंगला अशोक शिंदे, अंजना होले, उषा ताठे, शेवंता होले यांनी गटविकास अधिकारी किरण जाधव व बालविकास अधिकारी वंदना सोनवणे यांना निवेदन दिले असून, त्यांनी अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकेकडून अमृत आहार शिजविण्याचा अधिकार काढून घ्यावा व त्यांना तत्काळ निलंबित करावे अन्यथा सर्व महिला व ग्रामस्थ आमरण उपोषण करू, असे निवेदनात म्हटले आहे.