शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोरोना बाधीतांच्या मृत्यू दरात मोठी घट; मनपाा आयुक्त कैलास जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:39 IST

नाशिक - शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली मृत्यूचा दर कमी होत आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 

ठळक मुद्देकायम पदे भरतीचा प्रस्ताव

रविवारची मुलाखतसंजय पाठक

नाशिक - शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली मृत्यूचा दर कमी होत आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्यातुलनेत हा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 

प्रश्न- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे, त्यासंदर्भात काय सांगाल...

जाधव- शहरात कोरोना बाधीतांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या असल्याने रूग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसले तरी त्यामुळे संबंधीत बाधीतांवर तत्काळ उपचार करता येतात तसेच त्या बाधीतापासून अन्य कोणाला होणारासंसर्ग रोखला जाऊ शकतो. शहरात गेल्या काही महिन्यात याच पध्दतीने काम सुरू असल्याने मृत्यू दर कमी होण्यास मदत होत आहे. नाशिक शहराचा मृत्यू पाच टक्के होता तो आता कमी होत आला आहे. राज्यातील कोरोना बाधीतांचामृत्यू दर २.७० तर देशाचा १.६० इतका आहे, त्यापेक्षा नाशिकचा मृत्यू दर कमी आहे.

प्रश्न- कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी आता ती नियंत्रणात आण्यासाठी काय उपाय आहेत?

जाधव- शहरात चाचण्यांचे प्रमाणदेखील अशाच प्रकारे खूपच अधिक आहे. दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत ९२ हजार ७६९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पुण्याच्या तुलनेत या चाचण्या खूप असल्या तरी ही शहरे अत्यंत मोठी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी थेट तुलना होत नसला तरी एकुणच चाचण्या वाढवणे ही खूपच महत्वाची बाब आहे . आठ दिवसांपूर्वी शहरात सहा हजार अ?ॅक्टीव रूग्ण होते आता ते ४३०० आहेत. यातूनच रूग्ण बरे होण्याचे प्रमाणवाढल्याचे दिसते.

कायम पदे भरतीचा प्रस्तावमहाापालिकेने रूग्णालये आणि अन्य सुविधा दिल्या आहेत. आॅक्सिजन बेडसची संख्या वाढविली जात आहे. रूग्ण संख्या वाढली तर आॅक्सिजनची अडचण भासू नये यासाठी नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय तसेच डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय येथे आॅक्सिजनच्या टाक्या बसविण्यात येत आहेत. बिटको रूग्णालयात टाकी बसविण्यासाठी फाऊंडेशनचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. डॉ. झाकीर हुसेन येथेही काम सुरू होत आहे. मुख्य प्रश्न मनुष्यबळाचा आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कमर्चाऱ्यांची भरती केली जात असली तरी किमान मंजुर रिक्तपदे भरण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी राज्यशासनाला प्रस्ताव पाठविला आहे.आता पोलीसांबरोबर संयुक्त कारवाई

महाराष्टÑात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवस आहे. देशाचा कालावधी ४५ दिवस तर नाशिक शहराचा २६ दिवस इतका आहे. ही एकच सध्या उणिव आहे. अर्थात, संसर्ग कमी करतानाच नागरीकांनी आरोग्य नियमांचे पालन करावे यासाठी कारवाई वाढविण्यात आली असून आता पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करावी असा प्रस्ताव आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त