रवींद्रनाथ विद्यालयात भाषा संवर्धन सप्ताह
By Admin | Updated: January 25, 2016 00:13 IST2016-01-24T23:09:36+5:302016-01-25T00:13:02+5:30
रवींद्रनाथ विद्यालयात भाषा संवर्धन सप्ताह

रवींद्रनाथ विद्यालयात भाषा संवर्धन सप्ताह
नाशिक : रवींद्र विद्या प्रसारक मंडळ संचलित रवींद्रनाथ विद्यालयात मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात आला. मराठी भाषा समृद्धीसाठी व वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व साहित्यिकांच्या आठवणी विविध माध्यमांतून जागवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, बालकवी, बा. भ. बोरकर, सुरेश भट आदिंच्या कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे. मात्र, बदलत्या काळाची पाऊले ओळखून बहुभाषिक बनले पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी शिक्षक केशव चव्हाण यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक रामदास गायधनी, पर्यवेक्षक पुष्पा काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. आशाताई कुलकर्णी यांचे यावेळी मराठी भाषेसंदर्भात व्याख्यान झाले. यावेळी माधुरी नागपुरे, सुनंदा शिंदे आणि प्रियंका बर्वे यांच्यासह अन्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.