विमानाने १२ बाधितांचे लॅण्डिंग; रेल्वेतील चौघे कोरोना ट्रॅकवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:53+5:302020-12-05T04:21:53+5:30
लाेमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्याच्या सीमारेषेवर प्रवाशांची तपासणी ...

विमानाने १२ बाधितांचे लॅण्डिंग; रेल्वेतील चौघे कोरोना ट्रॅकवर?
लाेमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्याच्या सीमारेषेवर प्रवाशांची तपासणी आणि नियंत्रण सुरू केले आहे. ओझर येथील विमानतळ तसेच रेल्वेस्थानक या ठिकाणी जिल्ह्यात प्रविष्ट होणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. राजस्थान, गोवा, गुजरात तसेच दिल्ली येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिलेल्या आहेत तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
ओझर विमानतळ येथून गेल्या २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सुमारे ८०० प्रवासी नाशिकला उतरले आहेत. त्यापैकी ५२९ प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र होते, तर उर्वरित प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर वेगवेगळ्या दिवशी एकूण १२ प्रवासी काेरोनाबाधित आढळले. नाशिकरोड-इगतपुरी रेल्वेस्थानकावर एकूण चार बाधित आढळून आले.
--इन्फो--
गुजरात सीमारेषेवर बसप्रवाशांची तपासणी
गोवा, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली येथून नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिकला गुजरातची सीमारेषा जवळची असल्याने तेथून येणाऱ्या एस.टी. प्रवाशांची तपासणी चेक पाॉइंटवर केली जात असल्याची माहिती महामंडळाने दिली.
--इन्फो--
दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत वाढ
नाशिक जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असताना दिवाळीनंतर मात्र त्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. दिवाळीपूर्वी रुग्ण कमी झालेले असताना दिवाळीनंतर दैनंदिन रुग्णवाढ होत असल्याचे दिसते. आता दैनंदिन ३०० ते ४०० रुग्ण आढळत असल्याने शहरातील रुग्णवाढीचा वेग चिंता वाढविणारी आहे.