लोंढा नाला पुलाचे काम रखडले
By Admin | Updated: September 20, 2015 22:30 IST2015-09-20T22:30:25+5:302015-09-20T22:30:59+5:30
लोंढा नाला पुलाचे काम रखडले

लोंढा नाला पुलाचे काम रखडले
दाभाडी : मालेगाव - दाभाडी रस्त्यावर सुरू असलेल्या लोंढा नाला पुलाचे संथगतीने सुरू असलेले काम त्वरित करावे, अशी मागणी परिसरातील जनता व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या वर्षभरापासून याच रस्त्यावर दाभाडी - मालेगाव दरम्यान लोंढानाला परिसरात पुलाचे काम सुरु आहे. मात्र या कामाची गती अतिशय संथ असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम येथील वाहतुकीवर होत आहे. पुलाला पर्याय म्हणून तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे. या माती-मुरुमच्या रस्त्यावर मोठमोठाले दगड पुष्ठभागावर आलेले आहेत. शिवाय हा रस्ता खाचखळग्यांचा झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. वाहन पलटण्याचा धोका कायम आहे. (वार्ताहर)