फाळके चित्रपटसृष्टीसाठी लवकरच जमीन हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:08 IST2017-08-01T23:48:33+5:302017-08-02T00:08:33+5:30
नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीसाठी प्रस्तावित जमीन सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याकरिता सांस्कृतिक कार्य तसेच महसूल व वन विभागाची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

फाळके चित्रपटसृष्टीसाठी लवकरच जमीन हस्तांतरण
नाशिक : नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीसाठी प्रस्तावित जमीन सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याकरिता सांस्कृतिक कार्य तसेच महसूल व वन विभागाची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
विधिमंडळ अधिवेशनात आमदार जयंत जाधव यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय उपस्थित केला.
त्यांनी त्यात म्हटले आहे की, नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी निर्माण करण्याकरिता नाशिक विकास कार्यक्रमांतर्गत २७ आॅगस्ट २००९ रोजी दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी ५ नोव्हेंबर २०१४ रोज महाराष्टÑ चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाला अहवाल सादर केला आहे. प्रकल्पासाठी इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जागा सांस्कृतिक कार्य विभागाच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
शासनाने चित्रपटसृष्टीसाठी सांस्कृतिक कार्य विभागास जमीन हस्तांतरण करून काम सुरू करण्यासाठी काय कार्यवाही केली, असा प्रश्न विचारला होता. त्यावर तावडे म्हणाले की, चित्रपटसृष्टीसाठी प्रस्तावित जमीन सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव तपासण्यात येत असून, लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.