भऊर गावात लम्पिचे थैमान; चाळीस जनावरांना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:17+5:302021-09-21T04:16:17+5:30
या आजारामुळे जनावरांना अंगावर गाठी येतात. डोळे व नाकातून स्राव येतो. तसेच रोगट वासरू जन्माला येणे, दूध देण्याचे प्रमाण ...

भऊर गावात लम्पिचे थैमान; चाळीस जनावरांना संसर्ग
या आजारामुळे जनावरांना अंगावर गाठी येतात. डोळे व नाकातून स्राव येतो. तसेच रोगट वासरू जन्माला येणे, दूध देण्याचे प्रमाण कमी होणे आदी प्रकार घडतात. त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. या आजारासाठी जनावरांना देण्यात येणारी प्रतिबंधात्मक लस पुरवठा करण्यात सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे; मात्र स्थानिक पातळीवर निधीचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लस विकत घ्या व टोचा, असा आदेशच शासनाकडून शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांना आल्याने, पशुपालकांना लस विकत घ्यावी लागत आहे. त्यातही सरसकट लसीकरण न करता ज्या भागात लम्पिग्रस्त जनावरे आढळून येतील, त्या पाच किलोमीटर अंतरात येणाऱ्या जनावरांना फक्त लस देण्यात येत आहे. भऊर गावातील फक्त १०० जनावरांचे अद्याप लसीकरण करण्यात आले असून, गावातील जनावरांची आकडेवारी पाहता हा आकडा अगदीच नगण्य आहे. (२० भऊर)
200921\20nsk_34_20092021_13.jpg
भऊर गावात लंम्पिचे थैमानचाळीस जनावरांना संसर्ग