शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

निकवेल, दहिंदुले परिसरात चंदन वृक्ष केला लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 21:10 IST

कंधाणे : बागलाण तालुक्यातील निकवेल, दहिंदुले शिवारात चंदन चोरांचा सुळसुळाट निर्माण झाला असून, या चंदन चोरांनी शनिवारी (दि. २६) ...

ठळक मुद्देकंधाणे : चोरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कंधाणे : बागलाण तालुक्यातील निकवेल, दहिंदुले शिवारात चंदन चोरांचा सुळसुळाट निर्माण झाला असून, या चंदन चोरांनी शनिवारी (दि. २६) मध्यरात्री निकवेल येथील गट नंबर २१ ब अनिल वाघ यांच्या शेतातील चंदनाचे झाड कापून नेले.दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी दहिंदुले येथील हिरुबाई बहिरम व प्रमिला रमेश ठुमसे यांच्या शेतातून चंदनाचे झाड कापून नेले. यावेळी वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांनी वन विभागाचे वनरक्षक नवनाथ मोरे यांना कळविले. मोरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.नेहमीच निकवेल डांगसौंदाणे रस्ता अत्यंत वर्दळीचा असूनही रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन शनिवारी आसपासची चंदनाची झाडे तोडून नेली. त्यामुळे शेतकरी बांधावरील चंदनाची झाडे कापून नेली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.वन विभागाने चंदन चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सोनवणे, पोलीस पाटील विशाल वाघ, निकवेल येथील शेतकरी अनिल वाघ व परिसरातील नागरिकांनी केली आहे.सध्या परिसरात चंदन वृक्षावर तस्कर हात साफ करीत असून, अत्यंत वनौषधी असलेली ही झाडे तस्करांच्या नजरेस पडली असल्याने रात्रीचा फायदा घेत या झाडांची कत्तल केली जात आहे. तालुक्याला पोलीस निरीक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी नवीनच रूजू झाले असून, आपल्या आरोपी शोधाचे कसब वापरून या चंदन तस्करांच्या मुसक्या आवळतील का? का फक्त तपासाचे सोपस्कार पूर्ण करतात, याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी