याप्रकरणी सीमा सोपान बारी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी कुटुंबीयांसोबत दि. १८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२० दरम्यान जालना येथे गेले असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला व बेडरूममधील कपाटातील दोन सोन्याच्या अंगठ्या, ओमपान, चांदीची वाटी व चमचा तीन समई व रोख रक्कम असा एकूण २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
-----------
दुचाकी लांबविली
नाशिक : भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची अॅक्टिवा चोरीला गेली. शिवाजी पुंजा कोठुळे (रा. विहितगाव) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोठुळे हे भाजीपाला खरेदीसाठी सोमवार आठवडे बाजारात गेले होते. यावेळी त्यांची दुचाकी (क्र. एमएच १५ जीक्यू ९६२५) अज्ञाच चोरट्याने चोरून नेली.
----
Web Title: Lampas looted Rs 20,000 in burglary
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.