महावितरणकडून बत्ती गूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:21 IST2020-04-20T00:20:54+5:302020-04-20T00:21:13+5:30
गोदावरी डावा आणि उजव्या कालव्याला १५ तारखेपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून ते सुमारे महिनाभर चालणार आहे. मात्र, येथील वीज वितरण कंपणीच्या कनिष्ट अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत मुखेड, सत्यगाव, महालखेडा परिसरातील शेतकऱ्यांना फक्त दोन तास वीजपुरवठा सुरू ठेवला असून, ऐन उन्हाळ्यात शेतकºयांची बत्ती गूल केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या शॉकने शेतकरी वर्ग कोमात जाण्याची वेळ आली आहे.

महावितरणकडून बत्ती गूल
येवला : गोदावरी डावा आणि उजव्या कालव्याला १५ तारखेपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून ते सुमारे महिनाभर चालणार आहे. मात्र, येथील वीज वितरण कंपणीच्या कनिष्ट अभियंत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत मुखेड, सत्यगाव, महालखेडा परिसरातील शेतकऱ्यांना फक्त दोन तास वीजपुरवठा सुरू ठेवला असून, ऐन उन्हाळ्यात शेतकºयांची बत्ती गूल केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या शॉकने शेतकरी वर्ग कोमात जाण्याची वेळ आली आहे.
या हंगामात प्रतिकूल हवामानामुळे उन्हाळ कांद्याच्या लागवडी विलंबाने झाल्या. गहू पिकाचेही असेच काहिसे झाले. त्यामुळे गहू पिकाला शेवटचे तर उन्हाळ कांद्याला अजून दोन पाण्याची गरज आहे. सुदैवाने गत वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरी कधी नव्हे त्या एप्रिल महिन्यातही तुडुंब आहेत. मात्र, असे असताना वीज वितरण कंपनीच्या तुघलकी
निर्णयाच्या परिणामी शेतकºयाºया हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त होणार आहे.
एकप्रकारे वीज वितरण कंपनी करोनाचे रूप घेऊन शेतकºयांवर तुटून पडत असून यात शेतकरीवर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे मुखेडची नळपाणी पुरवठा योजना पाण्याअभावी जवळपास बंद पडली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. ही योजना गोदावरी डावा कालव्यावर अवलंबून आहे.
या योजनेचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यावेळी धरणातही पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती आहे. या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे निवेदनाद्वारे जिल्हा परिषद सदस्य कमल आहेर, छगन आहेर, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब आहेर, सरपंच भानुदास आहेर, ग्रामपंचायत सदस्य अनंता आहेर व शेतकºयांनी न्याय देण्याची विनंती केली आहे.