राज्यव्यापी संपामुळे धनत्रयोदशीलाच एसटीच्या तिजोरीतून ‘लक्ष्मी’ गायब; नाशिक विभागाला एक कोटीचा बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 20:52 IST2017-10-17T20:50:04+5:302017-10-17T20:52:54+5:30
जिल्ह्यासाठी एकूण ९३६ बसेस असून त्यांच्या एकूण पाच हजार ८४७ फेर्याचे नियोजन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून करण्यात आले होते; मात्र हे नियोजन संपूर्णपणे कोलमडले. कारण ४३६ बसेस रस्त्यावर चालल्यामुळे महामंडळाच्या नाशिक विभागाला ऐन दिवाळीच्या हंगामात धनत्रयोदशीलाच एक कोटी रुपयांचा फटका

राज्यव्यापी संपामुळे धनत्रयोदशीलाच एसटीच्या तिजोरीतून ‘लक्ष्मी’ गायब; नाशिक विभागाला एक कोटीचा बसला फटका
नाशिक : सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. शहराची सकाळ सत्रात तीस टक्के वाहतूक वगळता बससेवा पूर्णपणे ठप्प राहिल्याने महामंडळाला सुमारे एक कोटीचा आर्थिक फटका धनत्रयोदशीला बसला. दिवसभरात केवल ४३६ फेर्या होऊ शकल्या. विना हंगामी ९० हजारांचे दिवसाला नाशिक विभागाला उत्पन्न मिळते; मात्र हंगाम असल्याने एक कोटीचे नुकसान झाल्याचे प्रशासनाने कबूल केले.
शहर बस वाहतुकीच्या सुमारे तीन हजार फेर्या तर जिल्ह्यासह लांब पल्ल्याच्या सुमारे पाच हजार ८४७ फेर्या नियोजित होत्या; मात्र केवळ ४३६ बसेस धावल्या तर शहर बस वाहतुकीच्या सकाळ सत्रात २५ बसेस दुुपारी बारा वाजेपर्यंत रस्त्यावर धावल्या. एकूणच सकाळच्या सत्रातही केवळ वीस टक्के प्रवासी वाहतूक निमाणी स्थानकातून झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत सर्वच बसेसला ‘ब्रेक’ लागलेला होता. जिल्ह्यासाठी एकूण ९३६ बसेस असून त्यांच्या एकूण पाच हजार ८४७ फेर्याचे नियोजन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून करण्यात आले होते; मात्र हे नियोजन संपूर्णपणे कोलमडले. कारण ४३६ बसेस रस्त्यावर चालल्यामुळे महामंडळाच्या नाशिक विभागाला ऐन दिवाळीच्या हंगामात धनत्रयोदशीलाच एक कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला. एकूणच राज्यव्यापी संपामुळे धनत्रयोदशीलाच एसटीच्या तिजोरीतून ‘लक्ष्मी’ गायब झाली. संपामध्ये सहभागी झालेल्या चालक-वाहकांसह कर्मचाºयांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र रात्रीपर्यंत एकही कर्मचारी सेवेत हजर झाला नाही. दरम्यान, संपात सहभागी नसलेल्या संघटनांच्या पदाधिकार्यानी विभाग नियंत्रकांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. नाशिक विभागावर संपाचा तीव्र परिणाम झाल्याचे दिसून आले. एसटी कामगार सेना, कास्ट्राईब, संयुक्त कृती समितीचा अपवाद वगळता सर्व संघटना संपामध्ये उतरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रात्री उशिरापर्यंत कुठलाही तोडगा न निघाल्याने संप सुरूच आहे.
चार हजार चालक-वाहक संपावर
नाशिक विभागातून ६ हजार १४६ कर्मचार्यापैकी ४३३९ चालक-वाहकांसह कर्मचारी सहभागी झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे तर संपात एकूण सात संघटना सहभागी असून, सहा हजार कर्मचारी सहभागी असल्याचा दावा एसटी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला. इंटक, एस.टी. महामंडळ मेकॅनिक युनियन, मेकॅनिक-कंडक्टर युनियन, मोटार कामगार फेडरेशन, संघर्ष ग्रुप, विदर्भ एसटी कामगार संघटना, राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना संपात सहभागी आहेत.