चांदवड : येथील श्रीराम रोडवर अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मागील दाराचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा साठ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. श्रीराम रोडवरील प्रकाश गायकवाड यांच्या कल्पेश इलेक्ट्रॉनिक्स या दुकान घर आहे. गायकवाड कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी सांधत सोमवारी दुपारी अज्ञात चोरांनी मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कपाटात ठेवलेले २३ हजार रुपये रोख, सोन्याची अंगठी व अन्य दागिने असा एकूण साठ हजारांचा ऐवज चोरून नेला. प्रकाश गायकवाड व कुंटुंबीय सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आले असता कपाटातील बॅग, कपडे सर्व विखुरलेले दिसले. घरातील दागिने व पैसे चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चांदवड पोलीस स्टेशनला धाव घेत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक अनंत मोहीते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे.
घरफोडीत साठ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:25 IST