मालेगावी भरणा करणाऱ्या जवानास लाखाचा गंडा
By Admin | Updated: January 7, 2016 22:33 IST2016-01-07T22:19:12+5:302016-01-07T22:33:16+5:30
मालेगावी भरणा करणाऱ्या जवानास लाखाचा गंडा

मालेगावी भरणा करणाऱ्या जवानास लाखाचा गंडा
मालेगाव : पैसे भरण्यासाठी स्लीप भरण्याचा बहाणा करत दोघा अज्ञात भामट्यांनी सैन्य दलातील जवानाला एक लाख दहा हजाराला गंडा घातला. येथील स्टेट बॅँकेत ही घटना घडली. छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
सोमवारी (दि. ४) तालुक्यातील निमगुले येथील बबन नानाजी कदम हा सैन्य दलातील जवान मालेगाव येथील स्टेट बॅँक शाखेत आपल्या खात्यावर एक लाख दहा हजार रुपये भरण्यासाठी गेला होता. दोन अज्ञात भामटे त्याच्याजवळ आले व आमच्या खात्यात दोन लाखांचा भरणा करायचा असून, स्लीप भरता येत नाही ती भरून देण्याचा बहाणा करून बबन यास स्लीप भरण्याची गळ घातली. तो स्लीप भरत असताना रुमालात असलेले पैशांचे बंडल बबन याने त्यांच्याकडे सुपूर्द केले. भामट्याने नोटा मोजण्याच्या बहाण्याने आपल्याकडे असलेले पैशांचे खोटे बंडल बबनकडे दिले. स्लीप भरण्याच्या नादात दोघे भामटे फरार झाले. भामट्याने दिलेले पैशांचे बंडल बघितले असता त्यावर केवळ एक हजाराची नोट आणि खाली कागदचा गठ्ठा निघाला. फसवणूक झाल्याचे बबनच्या लक्षात आल्याने त्याने छावणी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक खेडकर करीत आहेत.
मालेगाव बाजार समिती निवडणूक; एक अर्ज दाखल
मालेगाव : मालेगाव बाजार समिती निवडणुकीसाठी एकूण ९२ अर्जांची विक्री झाली. सोसायटी मतदारसंघात इतर मागासवर्गीय गटातून रवींद्र विनायक बच्छाव यांचा गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल झाला. अर्ज दाखल करण्याची मुदत १८ जानेवारीपर्यंत आहे.