शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अलंगुण येथील घराला आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 17:22 IST

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील बसस्टँड जवळ राहणारे पांडुरंग झिप्रा महाले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सदरच्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआगीत जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील बसस्टँड जवळ राहणारे पांडुरंग झिप्रा महाले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सदरच्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात घठलेल्या या घटनेमुळे महाले यांचे कुटुंब पुरते हवालदिल झाले असून आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यांचा पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.या घटनेची सविस्तर माहिती अशी की, येथील पांडुरंग झिप्रा महाले (५५) यांच्या घराला शुक्र वारी (दि.२५) रोजी सकाळी नऊच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात तांदूळ, गहू, नागली, तूर, उडीद, कुळीद आदी धान्य व कडधान्येसह दूरदर्शन संच, मोबाईल, वापरातील कपडे, लाकडी मांडणी, सिमेंटी पत्रे, छपराचे लाकडी वासे, वह्या-पुस्तके आदी वस्तू जळून खाक झाल्यात.सदर घटनेची माहिती समजताच माजी आमदार जे. पी. गावित, वसंत बागुल, पांडुरंग भोये, पोलीस पाटील आनंदा गावित, पांडुरंग महाले, टी. के. महाले, यशवंत गावित, यशवंत भोये, शिवराम भोये आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह तरु णांनी आग विझवण्यासाठी मदत केली.सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजय सूर्यवंशी, नायब तहसीलदार एस. आर. बकरे यांनी तातडीने दखल घेऊन तलाठी एम. डी. गायकवाड यांच्या पथकाने नुकसानीचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :fireआगFarmerशेतकरी