शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावात लाखो लिटर्स पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:09 IST

वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे.

इंदिरानगर : वडाळागाव परिसरातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीद्वारे पाणीचोरीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीर नळजोडणीची संख्या वाढली असल्याची चर्चा आहे.वडाळागावातील अनेक भागांत अनधिकृत नळजोडणीची जणू स्पर्धाच लागली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत आहे. शहरात दररोज सुमारे साडेचार लाख लिटर पाणीगळती होते. त्यापैकी सुमारे दोन लाख लिटर्स पाण्याची गळती एकट्या वडाळागाव परिसरात होत आहे. अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत असल्याने अधिकृत जोडणीची संख्या कमी असल्याने महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही. यामुळे पालिकेचेदेखील नुकसान होत आहे.गेल्या अनेक वर्षांत येथील ठराविक भागात पाण्याच्या चोरीचे प्रकार वाढीस लागले आहे. महापालिका यंत्रणेलादेखील पाणीचोरीची ठिकाणी ज्ञात आहेत. परंतु त्यांच्याकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने पाणीचोरीचे सत्र सुरूच आहे. वडाळागाव परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे लाखो रु पयांच्या पाणीपट्टी माध्यमातून महसूल बुडत आहे. तरीही पाणीपुरवठा विभागाला जाग येत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पाणीपुरवठा विभागाला केव्हा जाग येणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.वडाळागाव परिसरातील काही भागांत सातत्याने वाढ होत आहे. मोलमजुरी करणारे तसेच हातगाडीवर व्यवसाय करणारे अनेक लोक या भागात राहातात. बहुतेक नागरिकांनी गुंठेवारी पद्धतीने नोटरीद्वारे जमीन विकत घेतली आहे. येथील मेहबूबनगरसह परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जलवाहिनीतून नळजोडणी अनधिकृतपणे केली आहे.अलीकडेच सुमारे अनधिकृत दोन हजार जोडणी परिसरात असल्याचे निदर्शनात आले होते ही घटना ताजी असतानाच मदिनानगर पाठीमागील परिसरात सुमारे चाळीस नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतली असल्याचे समोर आले. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची चोरी होत असताना पाणीपुरवठा विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त केला आहे.अनधिकृतपणे नळजोडणीमुळे पाणीपुरवठा विभागाचे पाणीपट्टीद्वारे मिळणारा महसूलदेखील बुडत आहे. शिवाय इंदिनरानगर परिसरात सातत्याने सातत्याने कृत्रिम पाणीटंचाईदेखील निर्माण होत आहे.अनधिकृत नळजोडणीचे काय?शहरात अधिकृत नळजोडणी असलेल्या ग्राहकांकडून महापालिका पाणीपट्टी वसूल करते तर अनेकांना नोटिसा देऊन त्यांना भरणा करण्यास भाग पाडले जाते, बंद मीटरप्रकरणी नोटीस देऊन दंडही आकारला जातो तर दुसरीकडे अनधिकृत नळजोडणी माहिती असूनही महापालिका त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई करीत नसल्याचे हा कसला न्याय? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीtheftचोरी