नाशिक : पार्क केलेल्या महागड्या कारमधून लॅपटॉप व रोख रकमेसह चोरट्यांनी दोन लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़धुळे -साक्री रोडवरील बाफणा हॉस्पिटलजवळील रहिवासी हरीष उर्फ रामू जैन हे बुधवारी (दि़५) रात्री आठ वाजेच्या सुमारास कामानिमित्त नाशिकमध्ये आले होते़ त्यांनी आपली बीएमडब्ल्यू कार (एमएच १६ एवाय ८२८८) कॅनडा कॉर्नर परिसरातील एका मोबाइल दुकानाजवळ पार्क केली होती़ या कारमधून चोरट्यांनी दोन लाख साठ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग व २० हजार रुपयांचा लॅपटॉप असा दोन लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ जैन यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यास माहिती दिली़ पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़
कारमधून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:54 IST