शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:06 IST

जेलरोड जुना सायखेडारोड रामेश्वरनगर येथील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सव्वापाच लाख रुपये रोख व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, असा सुमारे सव्वासात लाखांचा ऐवज चोरून नेला.

नाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडारोड रामेश्वरनगर येथील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सव्वापाच लाख रुपये रोख व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, असा सुमारे सव्वासात लाखांचा ऐवज चोरून नेला. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.जेलरोड जुना सायखेडारोड रामेश्वरनगरमधील प्रतीक बंगल्यात बांधकाम व्यावसायिक प्रेमचंद निंबाजी पाटील हे आपल्या कुटुंबीयासह राहतात. शनिवार (८ जून) मेव्हण्याचा हळदीचा कार्यक्रम असल्याने ते सकाळी ११ वाजता बंगल्याच्या दरवाजाला कडीकोंडा लावून सहकुटुंब कोपरगाव कोळपेवाडी येथे गेले. पाटील यांनी रात्री साइटवरील वॉचमन रघुनाथ गवई यास बंगल्यावर झोपण्यास सांगितले होते. मात्र गवई हा रात्री बंगल्यावर झोपण्यास गेला नाही. पाटील हे बंगल्याला कुलूप लावून गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील पाच लाख ३० हजार रुपये रोख तसेच चार सोन्याच्या बांगड्या, तीन अंगठ्या, साखळी, मिनी गंठन असे १ लाख ९४ हजार रुपये किमतीचे दहा तोळ्यांचे दागिने, असा एकूण सात लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.  वॉचमन गवई रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बंगल्यावर आले असता त्यांना मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला व पाठीमागील दरवाजा उघडा असलेला आढळून आले. गवई यांनी याबाबत लागलीच फोनवरून मालक पाटील यांना चोरी झाल्याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोऱ्यांचे प्रमाण वाढलेनाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व ग्रामीण भागामध्ये घरफोड्या, चोºया, दुचाकीचोरी यांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. चोºया रोखण्यात व झालेल्या चोऱ्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश येत नसल्याने सर्वसामान्य घाबरून गेले आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी