शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाखांचे दागिणे लंपास; लग्नसराईच्या हंगामात हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 14:25 IST

पाटीलनगरनंतर राणाप्रताप चौकात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ३० हजार रूपयांचे दागिणे लांबविल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्दे १ लाख ३० हजार रूपयांचे दागिणे लांबविल्याचे उघडकीसन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम यामुळे नागरिक बाहेरगावी

नाशिक : शाळांना असलेली उन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम यामुळे नागरिक बाहेरगावी जात असल्यामुळे बंद घरांना ‘लक्ष्य’ करण्याच्या घटना शहर व परिसरात सातत्याने सुरू असून अंबड पोलीस ठाणे हद्दीत सिडको परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना दिवसाआड घडत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पाटीलनगरनंतर राणाप्रताप चौकात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ३० हजार रूपयांचे दागिणे लांबविल्याचे उघडकीस आले आहे.चोरट्यांसाठी लग्नसराई, सुटीचा हंगाम सुगीचा काळ ठरत असून भरदीवसा तसेच रात्री बंद घरांचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत रोकड, मौल्यवान वस्तू, दागिण्यांवर चोरटे हात साफ करत आहेत. दोन दिवसांपुर्वी सिडकोमधील पाटीलनगर भागात अशाच पध्दतीने घरफोडी करत चोरट्यांनी ७० हजारांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा तपास सुरू होत नाही, तोच दुसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणाप्रताप चौकात घडली. येथील दत्तात्रय त्र्यंबक पाटील (४३) यांचे बंद घराचे कुलूप दोघा अज्ञात संशयितांनी शुक्रवारी (दि.१९) रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास तोडले. घरातील ३ ग्रॅम वजनाची ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, मणी, साडेतीन ग्रॅमचे सोन्याचे ६० हजार रूपये किंमतीचे कानातले वेल, आठ हजार रूपये किंमतीची ५ग्रॅमची सोन्याची अंगठी, २५ग्रॅमचा चांदीचा तोरड्याचा जोड, १२ हजार ५०० रूपयांची रोकड असा सुमारे १ लाख ३१ हजार २०० रूपयांचा ऐवज लूटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दा्नखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी