शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कमी दराच्या आमिषाने दोन लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:48 IST

कमी दरात किराणा पुरविण्याचे आश्वासन देत नातवाचे आॅपरेशनचे भावनिक कारण सांगून माधुरी एखंडे (४०, रा. शांतीनगर, मखमलाबाद) यांच्या ब्युटि पार्लरमध्ये येऊन चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांना सुमारे दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देमहिलांची फसवणूक : भावनिक ब्लॅकमेलिंग

नाशिक : कमी दरात किराणा पुरविण्याचे आश्वासन देत नातवाचे आॅपरेशनचे भावनिक कारण सांगून माधुरी एखंडे (४०, रा. शांतीनगर, मखमलाबाद) यांच्या ब्युटि पार्लरमध्ये येऊन चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांना सुमारे दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १ जानेवारी २०१८ ते १३ जुलै २०१९ या कालावधीमध्ये संशयित सोनम अनिल चौथे, अनिल रामचंद्र चौथे, प्रेम अनिल चौथे (रा. तळेनगर, रामवाडी) यांनी एखंडे यांच्यासह अन्य महिलांची भेट घेतली. त्यांना कमी दरात किराणा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत अन्नपूर्णा महिला को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था स्वत:ची असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच त्यांचे ब्युटि पार्लर गाठून नातवाच्या शस्त्रक्रियेचे भावनिक कारण पुढे करून संशयित चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांकडून पैसे उकळून सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक केली. किराणा माल विक्री करण्याच्या उद्देशाने या भामट्या जोडीने महिलांकडून पैसे उकळल्याचे फिर्यादित म्हटले आहे.एखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक साखरे करीत आहेत.आर्थिक फसवणुकीचे विविध फंडे समोर येत असून, शहरात मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया ते स्मार्ट डिजिटल बॅँकिंगप्रणालीचा गैरवापर करत अनेकांना चुना लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर किराणा माल कमी दरात पोहचविण्याचे सांगून तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घालण्याचा नवीनच प्रकार पंचवटीत घडला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी