घरफोडीत ५६ हजारांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: March 11, 2017 02:13 IST2017-03-11T02:13:30+5:302017-03-11T02:13:43+5:30

नाशिकरोड : बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lakhs of 56 thousand rupees in the house | घरफोडीत ५६ हजारांचा ऐवज लंपास

घरफोडीत ५६ हजारांचा ऐवज लंपास

 नाशिकरोड : बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड येथील चरणदास मार्केट मागील तुलसी पूजा रोहाउस येथे राहणाऱ्या शुभांगी दिनेश मावडीकर या बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त भावाकडे गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून तीन तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व ४ हजार रुपये रोख असा एकूण ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lakhs of 56 thousand rupees in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.