कारमधून अडीच लाखांची रोकड लंपास
By Admin | Updated: April 19, 2017 17:48 IST2017-04-19T17:48:25+5:302017-04-19T17:48:25+5:30
कारमधून अडीच लाखांची रोकड लंपास

कारमधून अडीच लाखांची रोकड लंपास
नाशिक - पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या कारचा पाठीमागील दरवाजा उघडून चोरट्यांनी लॅपटॉपसह सुमारे अडिच लाख रुपए असलेली बॅग चोरून नेल्याची घटना द्वारका परिसरात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुजर जैनोद्दीन मर्चंट (६६ रा.कालिका मंदिर पाठीमागे,) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मर्चंट हे व्यावसायीक असून ते मंगळवारी आपल्या दुकानात जाण्यापूर्वी कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर थांबले असता ही घटना घडली. द्वारका परिसरातील महमदभाई पंपावर कारमध्ये पेट्रोल टाकून ते पैसे देण्यासाठी खाली उतरले असता अज्ञात चोरट्याने कारच्या विरूध्द दिशेचे दार उघडून पाठीमागील आसनावर ठेवलेला लॅपटॉप आणि रोकड असलेली बॅग असा २ लाख ७५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.(प्रतिनिधी)