क्रेडिट कार्डचा वापर करून लाखाची फसवणूक
By Admin | Updated: April 26, 2017 16:44 IST2017-04-26T16:44:32+5:302017-04-26T16:44:32+5:30
क्रेडिट कार्डचा वापर करून लाखाची फसवणूक

क्रेडिट कार्डचा वापर करून लाखाची फसवणूक
नाशिक : बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून उत्तर प्रदेशमधील दोघा भामट्यांनी एक लाख रुपयांची आॅनलाइन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अंबड परिसरातील ऋग्वेद सोसायटीच्या शुभम पार्कमधील रहिवासी मनोज धिरज सावंत यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अमर तेजपाल व अनिल सिंग (रा. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) या दोघा भामट्यांनी ६ ते १५ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत सावंत यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचा वापर करून आॅनलाइन पद्धतीने स्नॅपडिल कंपनीच्या वेबसाईटवरून प्रथम ३८ हजार ७९८ रुपये व त्यानंतर ७० हजार रुपये अशी १ लाख ८ हजार ७९८ रुपयांची खरेदी केली़
आपल्या क्रेडिट कार्डवरून एक लाख रुपयांची खरेदी केल्याचे लक्षात येताच त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)