‘लेक वाचवा अभियान’चा समारोप
By Admin | Updated: January 21, 2017 23:09 IST2017-01-21T23:09:43+5:302017-01-21T23:09:57+5:30
येवला : सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

‘लेक वाचवा अभियान’चा समारोप
येवला : सावली समाजसेवी बहुउद्येशीय संस्था पाटोदाद्वारे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या लेक वाचवा अभियानाचा समारोप व जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोमठाणदेश येथे करण्यात आले.
यावेळी सावलीचे सचिव महेश शेटे यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियानचे तालुका संघटक संतोष चव्हाण, नैसर्गिक ऋ षी वृद्धाश्रम शिरसगाव लौकीचे अध्यक्ष नवनाथ आव्हाड उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊविषयी विचार मांडले. संतोष चव्हाण यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम स्कूल पुरणगाव, शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडिअम स्कूल अंदरसूल व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोमठाणदेशच्या शिक्षकांनी सावली संस्थेचे अभियान ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील ३८ शाळांमार्फत १८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)