पिंपळगाव (वा.) परिसरातील तलाव अद्याप कोरडेच

By Admin | Updated: August 13, 2014 00:45 IST2014-08-11T21:24:21+5:302014-08-13T00:45:09+5:30

पिंपळगाव (वा.) परिसरातील तलाव अद्याप कोरडेच

The lake in Pimpalgaon (O) area is still dry | पिंपळगाव (वा.) परिसरातील तलाव अद्याप कोरडेच

पिंपळगाव (वा.) परिसरातील तलाव अद्याप कोरडेच


पिंपळगाव वाखारी : परिसरात अजूनही दमदार पाऊस नसल्याने विहिरी व तलाव अद्याप
कोरडेच असून, खरिपाच्या
पिकांना व पोळ कांदा लागवडीस पाणी असल्याने खरिपाचे भविष्य अधांतरी आहे. पावसाअभावी पोळ कांद्याची लागवड होण्याची चिन्हे नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
पावसाळ्याचा अंतिम टप्पा आला असतानादेखील परिसरात समाधानकारक पाऊस नाही. अद्याप परिसरातील विहिरी कोरड्या असून, पाझर तलावात थेंबभर पाणी नाही. खरिपाच्या पेरण्या कशातरी आटोपल्या असल्या तरी पुरेशा पावसाअभावी पिकांचे भवितव्य अधांतरी आहे.
दरवर्षी १५ आॅगस्टला सुरू होणारी पोळ कांदा लागवड पाण्याअभावी ठप्प आहे. कांदा लागवड न झाल्यास शेतकरी आर्थिक कोंडीत सापडणार आहे. पुरेशा पावसाअभावी शेती व्यवसाय कोलमडला असून, समस्त बळीराजा भविष्याच्या काळजीने धास्तावला आहे. (वार्ताहर)

Web Title: The lake in Pimpalgaon (O) area is still dry