युवतीवर अत्याचार करणाºया बिल्डरपुत्रास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:37 IST2017-07-28T17:36:44+5:302017-07-28T17:37:11+5:30

lady,get,bad behaviour,by,builders son | युवतीवर अत्याचार करणाºया बिल्डरपुत्रास अटक

युवतीवर अत्याचार करणाºया बिल्डरपुत्रास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून युवतीवर गत सहा वर्षांपासून बलात्कार करणाºया बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शक्ती श्यामराव निकुंभ (२८, रा़ एऩ एस़ हाउस, श्रीरंगनगर पेट्रोल पंपाजवळ, गंगापूररोड, नाशिक) असे या संशयिताचे नाव आहे़
गोविंदनगर परिसरातील २८ वर्षीय पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित शक्ती निकुंभ व तिची महाविद्यालयापासून मैत्री आहे़ संशयित निकुंभ याने २०११ पासून विवाहाचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी तसेच महागड्या कारमध्ये वेळोवेळी बलात्कार केला़ युवतीच्या कुटुंबीयांकडून तिच्यासाठी वराची शोध मोहीम सुरू झाल्याने तिने निकुंभला विवाहाबाबत सांगितले असता त्याने विवाहास नकार देत युवतीला मारहाण करण्याबरोबरच दमदाटी केली़
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित शक्ती निकुंभविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

Web Title: lady,get,bad behaviour,by,builders son