गणपतीच्या प्रसादासाठी लाडू, मोदकवर जोर
By Admin | Updated: September 13, 2016 01:37 IST2016-09-13T01:37:35+5:302016-09-13T01:37:51+5:30
मोठ्या प्रमाणात खरेदी : तिखट पदार्थांनाही मागणी

गणपतीच्या प्रसादासाठी लाडू, मोदकवर जोर
नाशिक : गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात सुरू असून मंडळे, घरगुती गणपती, कॉलनी, सोसायट्यांमधील गणपती, बॅँका, कार्यालये, कंपन्या आदि ठिकाणी प्रतिष्ठापना झालेल्या गणपतींच्या सकाळ, सायंकाळच्या आरतीसाठी विविध प्रकारच्या नैवेद्यावर जोर दिला जात आहे.
शहरातील बुधा हलवाई, हाजी मिठाई, अग्रवाल स्विट्स, सागर स्विट्स आदिंसह शहरातील विविध दुकानांमध्ये मिठाईचे असंख्य प्रकार तयार केले जात असून, सकाळ-संध्याकाळच्या आरतीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. त्यात मोदक व लाडूंना सर्वाधिक मागणी आहे.
मिठाईबरोबरच फळांनाही मागणी आहे. फळे व सुका मेवाही प्रसादरूपात वाटला जात आहे. अनेक ठिकाणी गोडाबरोबरच तिखट पदार्थही प्रसादासाठी घेतले जात आहेत. त्यात ढोकळा, समोसे आदि पदार्थांना मागणी आहे. याशिवाय अन्य पदार्थांनाही ग्राहकांची पसंती आहे.