दुचाकीच्या डिक्कीतील लाखांची रोकड लंपास
By Admin | Updated: September 23, 2015 23:55 IST2015-09-23T23:55:04+5:302015-09-23T23:55:27+5:30
दुचाकीच्या डिक्कीतील लाखांची रोकड लंपास

दुचाकीच्या डिक्कीतील लाखांची रोकड लंपास
नाशिक : जिल्हा परिषदेजवळील अॅक्सिस बँकेतून काढलेली रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली असता चोरट्यांनी ती चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़ २१) दुपारच्या सुमारास घडली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, फेम टॉकीजजवळील राजमुद्रा सोसायटीत राहणारे साईनाथ शिंदे यांनी अॅक्सिस बँकेतून १ लाख ८० हजार रुपये काढले़ त्यानंतर ही रक्कम दुचाकीत (एमएच १५, बीव्ही ४५०५) च्या डिक्कीत ठेवली असता चोरट्यांनी ही रक्कम चोरून नेली़
या प्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ याबाबतचा अधिक तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)