पावसाअभावी खरीप पिकांना पाण्याची मोठी ओढ
By Admin | Updated: October 6, 2014 00:17 IST2014-10-04T23:03:12+5:302014-10-06T00:17:45+5:30
पावसाअभावी खरीप पिकांना पाण्याची मोठी ओढ

पावसाअभावी खरीप पिकांना पाण्याची मोठी ओढ
वडाळीभोई : परिसरासह चांदवड तालुक्यात पावसाअभावी खरीप पिकांना पाण्याची मोठी ओढ
दिली असून, वीजपुरवठ्याचाही खेळखंडोबा झाल्याने खरीप पिकांचे पन्नास टक्के नुकसान निवडणुकीचा प्रचार व रणधुमाळीत शेतकरी मात्र चिंतातुर झाला आहे. दरवर्षी दसऱ्यानंतर बाजरी तर दिवाळीपूर्वी मका, सोयाबीन, पिकाची सोंगणी होते. मात्र यंदा पाऊस उशिरा आला. त्यामुळे खरिपाची पिके सोयाबीन, मका, मूग, उडीद, कांदा उळे आदि सर्वच पिके उशिरा पेरली गेली. आणि आज पिके ऐन जोमात दाणे भरण्याच्या स्थितीत असताना जवळपास गणपती उत्सवापासून वडाळीभोई परिसरात पाऊसच न झाल्याने खरिपाची पिके पाण्याअभावी करपूनच नाही तर ५० टक्के मका, सोयाबीन ही मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील पिके चक्क जळून खाक झाली
असून, रानच्या गवतानेही हाय खाल्ली आहे.