खासगी क्षेत्रात प्रशिक्षित चालकांचा अभाव
By Admin | Updated: April 12, 2016 00:15 IST2016-04-11T23:54:21+5:302016-04-12T00:15:26+5:30
बेरोजगारी : ‘आयटीआय’मार्फत प्रशिक्षणाची मागणी

खासगी क्षेत्रात प्रशिक्षित चालकांचा अभाव
नाशिक : खासगी परिवहन उद्योग क्षेत्रात प्रशिक्षित चालकांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचे हे क्षेत्र असून, त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामार्फत अशाप्रकारचे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत, अशी मागणी आॅल इंडिया टुरिझम अॅण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल यांनी या सदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, परिवहन उद्योग हा देशातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. दिवसेंदिवस हे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. बेरोजगार तरुणांनी या क्षेत्राकडे व्हावे यासाठी त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण मिळाले पाहिजे. त्यांना चांगली व सुरक्षित नोकरीची हमी, आकर्षक वेतन आदि सुविधा मिळू शकतील नवतरुणांमध्ये या क्षेत्राविषयी आकर्षण वाढून या उद्योगातील मनुष्यबळाचा प्रश्न सुटू शकेल. त्यामुळे याविषयावर लक्ष केंद्रित करून वाहनचालकांसाठी विशेष प्रशिक्षण, नोकरी व रोजगारात विविध सुविधांचा त्यांना लाभ मिळावा आदिंसाठी खास धोरण राबविण्याची गरज असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)