आंबेडकरनगर भागात शौचालयाची दुरवस्था
By Admin | Updated: July 3, 2014 00:10 IST2014-07-02T21:30:01+5:302014-07-03T00:10:16+5:30
आंबेडकरनगर भागात शौचालयाची दुरवस्था

आंबेडकरनगर भागात शौचालयाची दुरवस्था
सिन्नर : येथील आंबेडकरनगर भागातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याची तक्रार नागरिकांनी सिन्नर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वावी वेस भागातील आंबेडकरनगरमधील शौचालयांचे दरवाजे तुटले असून, वीज व पाण्याअभावी नागरिकांची कुचंबणा होत आहे. शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चेंबरही उघडे असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. या भागात पालिकेचे सफाई कामगार काम करत नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर सागर जाधव, अविनाश डांगळे, विजय वाघमारे, कैलास जाधव, आनंद जाधव, विकास जाधव, आदिंसह महिला व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.(वार्ताहर)
राष्ट्रीय समाजच्या अध्यक्षपदी गोराणे
येवला : राष्ट्रीय समाज पक्षाच्या येवला तालुका अध्यक्षपदी संजय शिवाजी गोराणे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कैलास कोळसे यांनी गोराणे यांना नियुक्तिपत्र दिले आहे. या पत्रात पक्षवाढीसाठी प्रयत्न करून, तालुक्यातील गावपातळीवर शाखा स्थापन करून विविध नियुक्त्या कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.