भातपिकावर परतीच्या पावसाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:24 IST2017-10-11T00:24:32+5:302017-10-11T00:24:57+5:30
इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार परतीच्या पावसाचा फटका तालुक्यातील भातपिकाला बसत असून, शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे.

भातपिकावर परतीच्या पावसाचे संकट
घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार परतीच्या पावसाचा फटका तालुक्यातील भातपिकाला बसत असून, शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे.
पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होऊन भातपिकाला पोषक पाऊस झाला असताना, आता मात्र परतीच्या मुसळधार पावसामुळे ऐन पिकावर आलेले भातपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कमी दिवसांत येणाºया हळी जातीचे पीक कापणीला आले असून, या पिकाच्या ओंब्या पक्व झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकºयांनी भाताची कापणी सुरू केली आहे. भात कापून तो शेतामध्ये वाळविण्यात येतो. मात्र दुपारनंतर वीज, वाºयासह मुसळधार पाऊस होत असल्याने पिके आडवी होऊन सडवा होऊन प्रचंड नुकसान होत असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.