संततधार पावसामुळे ओझरला जनजीवन विस्कळीत घरे पडली, वाहनांचे नुकसान
By Admin | Updated: July 31, 2014 01:49 IST2014-07-31T01:48:42+5:302014-07-31T01:49:11+5:30
संततधार पावसामुळे ओझरला जनजीवन विस्कळीत घरे पडली, वाहनांचे नुकसान

संततधार पावसामुळे ओझरला जनजीवन विस्कळीत घरे पडली, वाहनांचे नुकसान
ओझरटाऊनशिप : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओझरला जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. घरे पडल्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले. बाणगंगेलो पूर आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुरेसा पाऊस नसल्याने बाणगंगा नदील गटारीचे स्वरूप आले होते. या पावसामुळे अनेक वर्षांनंतर बाणगंगेला पूर आल्याने आता या नदीचे पाणी आत स्वच्छ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
पावसामुळे सुतार गल्लीतील एका जुन्या घरातील भिंत कोसळली. सुदैवाने या तकोणीही जखमी झाले नााही. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही भिंत कोसळली यावेळी या घरात रामदास बोराडे हे पत्नी व मुलांसमवेत घरातच होते. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याच घराच्या खाली एमएच०१-व्हीए-७४०४ या क्रमांकाची चारचाकी गाडी उभी होती. या वाहनावर या घराची भिंत कोसळल्याने या वाहनाचे मोठे नुकसान झाले. यात बसलेले सतोष खरोटे हा वाहनचालक जखमी झाला आहे. क
पावसामुळे आलेला पूर पाहण्यासाठी ओझरकरांनी अलोट गर्दी केली होती. मारूनी वेस जवळच्या पुलाला पुराचे पाणी टेकले आहे. जुना सायखेडा रस्त्यावरील शिंदे मळ्याकडे जाणारा पूल या पुराच्या पाण्याखाली आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुर ूअसल्याने पाण्याची टाकी, पोलिस चौकीजवळ आणि बसस्थानक परिसरात पाण्याचे तळे साचले आहेत. सायखेडा रस्त्यावरील पुलाचे काम सुर असल्याने खेरवाडी रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. वळविलेल्या या रस्त्यावर चिखल साचल्याने वाहनांची कोंडी झाली होती.